महाराष्ट्रातील शैक्षणिक विकासात १३७ वर्षे गौरवास्पद योगदान देणारी तसेच पुणे, मुंबई, सोलापूर, चिपळूण व बेंगलुरू या ठिकाणी ४० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था सुरू करणारी पुण्यातील अग्र नामांकित शिक्षण संस्था तसेच शैक्षणिक संस्थांसाठी फक्त इमारती बांधण्यापेक्षा त्या इमारतींना ज्ञानाचे केंद्र बनविण्यावर विश्वास असणारी संस्था म्हणजेच पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी ही संस्था होय!
नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरं उध्वस्त झाली, शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले, अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, अनेक जनावरांना जीव गमवावा लागला. हे जे नुकसान झाले आहे ते भरून न येणारे आहे. शैक्षणिक योगदानाबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये १ कोटी इतकी रक्कम चेक द्वारे दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली.
याप्रसंगी मा. राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, शि. प्र. मंडळीचे मा. उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष सोहनलाल जैन नियामक मंडळ, मा. उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, मा. नियामक मंडळ सदस्य जयंत किराड, सतीश पवार, डॉ. उदय साळुंखे इ. मान्यवर उपस्थित होते.