ध्रुपद गायन कार्यशाळा

शिक्षण प्रसारक मंडळी    14-Mar-2026
Total Views |
शिक्षण प्रसारक मंडळी व SPICMacy यांच्या वतीने सर परशुरामभाऊ महाविद्यालय ,पुणे येथील दृक्श्राव्य सभागृहात ध्रुपद गायन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शिक्षण प्रसारक मंडळीच्या एस्.पी. एम् इंग्रजी माध्यम शाळा, नू.म.वि., वा.दि.वैद्य,शाळेतील विद्यार्थी तसेच स.प महाविद्यालयातील कलामंडळातील संस्कृत विभागातील विद्यार्थी सहभागी झाले .
 
उस्ताद वसिफुद्दीन डागर यांनी लीलया ध्रुपद गायन सादर केले व विद्यार्थ्यांनाही गायनात सामावून घेतले. संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.
 
पखवाज साथ मोहन शर्मा यांनी तर तानपुरा साथ चिन्मय कुलकर्णी व मिहिका जोशी या संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाॅ.अविनाश मोहरील यांनी केले. अतिथी परिचय आद्या चांदेकर अथर्व जगदाळे या कलामंडळातील विद्यार्थ्यांनी केले. ईशस्तवन ईशान मोडक याने केले तर कृतज्ञता वितरण अर्णव जोशी याने केले. कार्यक्रमास spic macy चे निरंजन लिमये आवर्जून उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे आयोजन शि.प्र.मंडळी चे अध्यक्ष मा.सुधीरजी काळकर यांच्या प्रोत्साहनाने घेण्यात आला यासाठी शि.प्र.मंडळी चिटणीस रमा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात अनमोल सहाय्य केले , सौ रमा कुलकर्णी व सुजित मंगलोरकर (CEO शि.प्र मंडळी) आवर्जून उपस्थित हि राहिले .कार्यक्रम संयोजनात कलामंडळ व संस्कृत विभागप्रमुख डाॅ. भारती बालटे व हिंदी विभागप्रमुख डाॅ.गोरख थोरात यांनी सक्रिय सहभाग घेतला. कला व संस्कृत विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी पुढाकाराने काम केले. विद्यार्थी उस्तादजींना कृतज्ञता म्हणून S.P.M English School च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले भेटकार्ड दिले.


Dhrupad Singing Workshop1
Dhrupad Singing Workshop2